हिंजवडी : भरधाव अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 26) पहाटे तीनच्या सुमारास बावधन येथे घडली. अर्जित अशोककुमार पुरवार (वय 21, रा. डीएसके रानवारा, बावधन) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अर्जितचा मित्र तरुण गुप्ता (वय 21, रा. तळेगाव दाभाडे) याने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अर्जित मूळचा उत्तरप्रदेशचा
अर्जित हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी होता. रविवारी पहाटे तो दुचाकीवरून कामावरून घरी परत जात होता. बावधन येथून जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरात धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता पोबारा केला. हिंजवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जी. जे. धामणे तपास करत आहेत.