हिंदीमधील अंतर्निहित क्षमतेमुळे तिची वैश्विक भाषेकडे वाटचाल

0

जळगाव : हिंदी भाषेत प्रेम आणि सौहार्द भाव वसलेला आहे. तिच्यात इतर भाषेतील शब्दांना सहज स्वीकारण्याची क्षमता आहे. त्यामुळे भाषिक विकास नियमानुसार ती अधिक व्यापक आहे. राष्ट्र्भाषेकडून विश्वभाषेकडे हिंदीचा झालेला प्रवास थक्क करणारा असल्याचे प्रतिपादन प्रा. ए.बी. पाटील यांनी केले. मू.जे.च्या हिंदी विभागाच्या वतीने मंगळवार 10 जानेवारीला विश्व हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश तायडे होते. प्रा. पाटील यांनी सांगितले की, विश्वभर पसरलेल्या भारतीय लोकांनी आपल्या संस्कृतीच्या अभिव्यक्ती साठी हिंदी भाषेला माध्यम बनविले, त्यामुळे हिंदीचा जगभर प्रचार-प्रसार झाला असल्याचे म्हटले.

विश्वस्तरीय भाषा बनविण्यासाठी प्रयत्न
प्रा. पाटील यांनी पुढे सांगितले की, खानदेश सुपूत्र लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी हिंदी प्रचार समिति, वर्धाच्या अध्यक्षपदी असतांना भारतात पहिले विश्व हिंदी संमेलन 1975 ला नागपूर येथे आयोजी केले. तेव्हापासून हिंदीला विश्व स्तरावरील भाषा बनविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे स्पष्ट केले. यातून आपल्या विश्वबंधुत्व मूल्याची रुजवणूक साक्र होणार यात शंका नाही.कारण भाषा ही जोडण्याचे काम करते, ती मैत्रीचा सेतू असते आणि हिंदी भाषेत ती संभावना विद्यमान आहे.

परदेशात शिकविली जाते हिंदी
2006 पासून विश्व हिंदी दिन भारत आणि भारताबाहेर सुमारे 215 देशामध्ये साजरा करण्यात येतो. हिंदी भारताबाहेर 180 देशांमधील विद्यापीठांमध्ये शिकवली जाते. आणि संख्येच्या दृष्टीकोनातून जगात द्वितीय क्रमांकाची भाषा आहे. या भाषेचा भारतात राजभाषा व संपर्कभाषा म्हणून उपयोग केला जातो. तिच्या सन्मानासाठी ठिकठिकाणी 10 जानेवारी हा विश्व हिंदी दिन साजरा केला जातो.त्यानिमित्ताने मू.जे.महाविद्यालयाच्या हिंदी विभागाकडून व्याख्यानाचा आणि हिंदी कथा-हिंदी लघु नाटकांच्या प्रसारणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी असलेल्या डॉ.सुरेश तायडे यांनी ही ‘हिंदी तील भाषिक व साहित्यिक बलस्थाने विशद केली.आणि वर्तमान संदर्भातील हिंदीच्या महत्वावर प्रकाश टाकला.यावेळी हिंदी विभागातील प्रा.विजय लोहार व प्रा.रोशनी पवार उपस्थित होते. विद्यार्थी विजय पावरा याने हिंदीच्या संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कु.माधुरी जगताप हिने केले. सूत्रसंचालन मुक्ती जैन हिने तर आभार धनराज पावरा याने मानलेत.