जळगाव: के.सी.ई. सोसायटी च्या ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात डॉ अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे जन्मशताब्दी ,के.सी.ई. संस्थेचा वर्धापनदिन तसेच हिंदी दिनानिमित्त आंतरशालेय हिन्दी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये राष्ट्रभाषा ‘हिंदी का महत्व’ , ‘हिंदी मेरी पहचान’ हे विषय देण्यात आले..यात संस्थेतील सर्व शाळांचे विदयार्थी सहभागी झाले या स्पर्धेत पहिल्या गटात वेदान्त राजेन्द्र बाविस्कर(प्रथम), आश्विनी सोमनाथ पतंगपुरे (द्वितीय) , उत्कर्षा देवेंद्र शिंदे (तृतीय ) तर दुसऱ्या गटात विद्या दादालाल राठोड (प्रथम) , मृणाली पाटील(द्वितीय), जानव्ही प्रवीण जैन (तृतीय) हे विद्यार्थी विजयी झाले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मु.जे.महाविद्यालयाचे उप.प्राचार्य प्रा.डॉ सुरेश तायडे होते . यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन माधुरी भंगाळे यांनी केले. या प्रसंगी मुख्यध्यापक डी.व्ही.चौधरी ,शालेय समन्वयक श्री.शशिकांत वडोदकर,श्री.के.जी फेगडे ,सुचिता शिरसाठ, व्ही.एस गडदे आदी शिक्षक उपस्थित होते.