घाटकोपर । कोवळ्या वयातील मुलामुलींचा सुरक्षतेचा प्रश्न खूपच जटील होत आहे. रस्त्या रस्त्यावर असुरक्षित असणारे मुलं आता तर घर आणि शाळांमध्ये देखील असुरक्षित आहेत. हे सत्य आहे. या विषयावर आपण महिलांनी गाभिर्याने घेणे गरजेचे आहे. अबला म्हणवली जाणारी स्त्री आता सबला झालेली आहे. साक्षरता मिळवून स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशाच्या उंचावर जात आहे. मात्र समाजातील वाईट नजरेतील प्रवृत्ती अजूनही स्त्रीला उपभोगाचे साधन समजत आहे. मुलींनो अशा समाजातील दुष्कृत्या शक्तींचा नायनाट करण्यासाठी तुम्ही सशक्त व्हा आणि होत असणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उचला.
मान्यवरांची उपस्थिती
शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र कुमार तिवारी, मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा ठाकूर, मुंबई अध्यक्षा नीलम ठाकूर, उपाध्यक्षा विनिता सिंह, संगीता चौहान, सीमा मिश्रा, दीप्ती सिंह, अपर्णा सिंह आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.
स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण
अखिल महिला सशक्तीकरण मंचच्या वतीने लवकरच शाळांमध्ये जाऊन मुलींना, मुलांना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण सुरु करणार असल्याचं देखील राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा ठाकूर यांनी कार्यक्रम प्रसंगी नमूद केले. शिबिरात मुलांची संपूर्ण शारीरिक तपासणी मोफत करण्यात आली.