इंदापूरः- येथील कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात हिंदी विभागच्या वतीने ’ हिंदी साहित्य विधाएँ ’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेचे उदघाटन पुणे येथील एस.पी. महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ. पद्मजा घोरपडे यांनी केले.यावेळी हिंदी विभागातील विद्यार्थ्यांनी शोध निबंधाचे वाचन केले. महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील,संस्थेच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे आणि हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. शितल माने यांनी दिली. प्रा.भगवान बारवकर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शितल माने यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शुभांगी वाघ यांनी केले.आभार प्रा.सोमनाथ चव्हाण यांनी मानले.
घोरपडे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी वाचन,लेखनामध्ये गोडवी निर्माण करावी तरच आपल्या बुद्धिचा विकास हाईल. शिक्षण केवळ नोकरी मिळविण्यासाठी करू नका तर जीवनात आंनद मिळवण्यासाठी करा.