हिंदुंनो चार-चार मुले जन्माला घाला!

0

उडुपी : हिंदूंनो समान नागरी कायदा लागू होईपर्यंत 4 मुले जन्माला घाला असे आवाहन हरिद्वार येथील भारत माता मंदिराचे स्वामी गिरीजी महाराज यांनी केले आहे. कर्नाटकात उडुपी येथे विश्‍व हिंदू परिषदेतर्फे तीन दिवसांच्या धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्वामींनी हिंदुंना चार-चार मुले जन्माला घाला, असा सल्ला दिला.

धर्म संसदेच्या दुसर्‍या दिवशी पत्रकारांशी बोलताना स्वामींनी हिंदुंच्या कमी होणार्‍या लोकसंख्येकडे लक्ष वेधले. ज्या क्षेत्रात हिंदुंची लोकसंख्या कमी झाली तो भाग हिंदुस्थानला गमवावा लागला आहे. त्यातच सरकार दोन मुलांची सक्ती करत आहे. पण जोपर्यंत देशात समान नागरी कायदा लागू होत नाही तोपर्यत हिंदुंनी कमीत कमी चार मुले जन्मास घालायालाच हवीत. दोन मुलांना जन्म घालण्याचे धोरण फक्त हिंदुंपुरतेच मर्यादीत असता कामा नये, असेही यावेळी स्वामी म्हणाले.