हिंदूंच्या भावनेशी खेळ केल्यास ठोकून काढू; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

0

सोलापूर-राम मंदिर आम्हीच बांधणार अशी वल्गना ही सरकार करते मात्र प्रत्यक्षात काम करत नाही. ‘अच्छे दिन येणार, १५ लाख देणार असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण केले नाही. आश्वासन पूर्ण केले नाही. काही हरकत नाही. तुम्हाला माफ करू, परंतू हिंदूंच्या धार्मिक भावनेशी खेळ केल्यास भाजपला ठोकून काढू अशा तिखट शब्दात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपला इशारा दिला आहे.

सर्व आश्वासने चुनावी जुमले होते असे सांगतात मात्र राम मंदिराचा मुद्दा जरा चुनावी जुमला असेल तर शिवसेना हे कधीही खपवून घेणार नाही. किमान  महाराष्ट्रात तरी शिवसेना भाजपला हिंदूंच्या धार्मिक भावनेशी खेळ करू देणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.