मात्र, त्यांच्या वक्तव्याला आधार म्हणून अप्रत्यक्षपणे त्या हिंदू समाजाला दूषणे देत आहेत, हे निषेधार्ह आणि आक्षेपार्ह आहे. अल्पसंख्याकांच्या हत्येच्या घटनेने गांधी परिवार आणि काँग्रेसजन संतप्त होतात. मात्र, हिंदूंच्या हत्येप्रकरणी थंड असतात, हा अनुभव आहे. या दुटप्पीपणामुळे त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले, तरी आत्मचिंतन करून चुकांतून शिकण्याची स्थिती नाही. त्यामुळेच पुन्हा पुन्हा हिंदूद्वेषाचा राग आळवला जातो.
सध्या गोवंश हत्याबंदीच्या मुद्द्यावरून देशाचे वातावरण ढवळवून निघत आहे. गोमाता हिंदूंना पूजनीय आहे. हिंदू समाज केवळ उपयुक्त पशू म्हणून नाही, तर गोमातेला देवतेच्या रूपात पूजतो. भगवान श्रीकृष्णापासून गोपालनाची परंपरा आहे. हिंदूंच्या धर्मश्रद्धांचा मान राखण्याच्या जोडीलाच चांगल्या अर्थव्यवस्थेसाठीही समृद्ध गोवंश आवश्यक आहे. गोवंश हत्याबंदी, गोरक्षण आणि गोसंवर्धन या मागण्या हिंदूंच्या धार्मिक भावनांशी निगडित आहे. भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला धर्मपालनाचे स्वातंत्र्य आहे. कुणाचेही स्वातंत्र्य इतरांच्या धार्मिक भावनांवर अतिक्रमण करणारे नसावे, असे संविधान सांगते. त्यामुळे आम्हाला जे आवडेल, ते आम्ही खाऊ असे म्हणणार्यांनी आणि अशांचा कैवार घेणार्यांनी त्यांच्याकडून संविधानाचा अवमान होत आहे, हे लक्षात घ्यावे. संविधानाच्या मार्गदर्शन तत्त्वांमध्येही गोहत्याबंदीचा उल्लेख आहे.
भारतावर अनेक दशके काँग्रेसचे राज्य होते. त्यांना प्रातःस्मरणीय असलेल्या गांधींच्या गोहत्याबंदी आणि गोसंरक्षण यांच्या संदर्भातील भावनांचा तरी काँग्रेसने विचार करून देशभर गोवंश हत्याबंदी कायदा लागू करायला हवा होता. काँग्रेसने तसे तर केलेच नाही, उलट अवैध पशुवधगृहे चालू देणे, त्यांचे आधुनिकीकरण करणे, गोरक्षकांवर आक्रमणे करणार्या कसायांकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार करून सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून त्यांचे खच्चीकरण केले. ज्याप्रमाणे एखादी गोष्ट खूप दाबली गेली, तर विशिष्ट टप्प्यानंतर ती उसळून वर येते, त्याप्रमाणे आता हिंदूंच्या असंतोषाचा उद्रेक होत आहे, असे वाटते. हिंदूंच्या भावनांचा उद्रेक व्हायला काँग्रेसच उत्तरदायी आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे प्रियंका वढेरांचा होणारा संताप हा त्यांच्याच कृत्यांचा परिपाक आहे. त्यांनी त्यांच्या सत्ताकाळात अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनाचे राजकारण केले नसते, तर आज ही स्थिती आली नसती.
हिंदूंच्या हत्या, काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद यांविषयी चकार शब्द न बोलणार्या प्रियांका वढेरा ज्या वेळी मोजक्या घटनांचा (ज्या घटनांची खरी कारणे अद्याप माहीतही नाहीत) संदर्भ देऊन त्यांचा तिळपापड होत असल्याचे सांगतात, त्या वेळी साहजिक धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांच्या मनात खालील प्रश्न निर्माण होतात. प्रियांका वढेरा, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर काँग्रेसजन खालील घटनांसंदर्भात थंड का?
1. काँग्रेसने देशाच्या फाळणीला मान्यता दिल्यानंतर धर्मांधांकडून 10 लाख हिंदूंची हत्या करण्यात आली. लाखो हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले. 2. गांधींच्या हत्येनंतर ब्राह्मणांना वेचून वेचून मारण्यात आले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शेकडोे शिखांची हत्या करण्यात आली. 3. पाकने काश्मीरमध्ये घुसखोरी करून काही भाग बळकावल्यानंतर नेहरूंनी तो प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेऊन चिघळत ठेवला. त्याची फळे आजही भारतीय सैनिक आणि नागरिक यांना भोगावी लागत आहेत. 4. 1989मध्ये लक्षावधी काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद करण्यात आला. त्यांना काश्मीरमधून परागंदा करण्यात आले. अनेक हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आले. 5. साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर मरणप्राय अत्याचार करण्यात आले. 6. आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांनी बोडो हिंदूंच्या हत्या केल्या. 7. मुंबईत रझा अकादमीच्या मुसलमानांच्या मोर्चात महिला पोलिसांवर अत्याचार करण्यात आले. 8. भिवंडी येथे धर्मांधांनी दोन पोलिसांना जिवंत जाळले. अशी कितीतरी मोठी सूची देता येईल.
या सगळ्याच्या संदर्भात कधी धर्मांध मुसलमानांच्या निषेधाचे आणि हिंदूंच्या सांत्वनाचे शब्द निघाल्याचे आठवत नाही. गोरक्षकांकडून झालेल्या कथित आक्रमणाने व्यथित आणि संतप्त झालेले काँग्रेसजन केरळमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका वासराला भरचौकात कापून त्याची मेजवानी झाडल्याप्रकरणी संताप व्यक्त केला नाही. अशांवर केवळ निलंबनाची कारवाई आणि मात्र गोरक्षकांवर कठोर कारवाईची मागणी हाच हिंदूद्वेष आणि गोद्रोह आहे. राजकारण्यांचा हिंदूंवरील अत्याचारांसंदर्भातील थंडपणा हाच हिंदूसंघटनाचे महत्त्वाचे कारण बनला आहे आणि त्यातूनच हिंदू राष्ट्राची ठिणगी पेटली आहे. पुढे हिंदवी स्वराज्याच्या धर्तीवर हिंदू राष्ट्राची स्थापना होईल. हिंदू राष्ट्रात गोमाता, मंदिरे, श्रद्धास्थाने सुरक्षित असतील, सर्व धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी निर्भय वातावरणात राहतील. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या दुटप्पीपणाला न भूलता हिंदूंनी हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी कृतिशील व्हावे, हीच अपेक्षा!
– अभय वर्तक
प्रवक्ता, सनातन संस्था