हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

0

नवापूर । येथे सरसेनापती हिंदूहद्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम इंदिरा नगर सप्तशृंगी चौक येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व प्रथम बाळासाहेब ठकारे यांच्या प्रतिमेस माजी शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र सोनवणे याचा हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रशांत पाटील यांनी बाळासाहेब ठकारे यांच्या कार्याविषयी माहिती दिली. हाच तो दिवस..याच दिवशी…तमाम मराठी जनतेच्या अश्रूंचा बांध फुटायला लावणारी घटना घडली…लाखो-करोडोंच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेले बाळासाहेब ठकारे आपल्याला सोडुन गेले असे भावउद्गार काढले.

यांनी वाहिली आदरांजली
जितु अहिरे, कुणाल सोनार,जयेश चादेकंर यांनी बाळासाहेबां विषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाला विजय बागुल, बन्सीलाला सोनवणेे, शरद नेर, शहरप्रमुख गोविंद मोरे,किसन शिरसाठ, दिनेश भोई,गोपी सैन,राहुल टिभे,रोहन पवार,राकेश सोनवने,सागर सोनवने,भटु ढोले,सचिन महाले,सतिष कोळी ऋतुल कुलकर्णी,विक्की भो,बादल शाह,ललित सोनार, नवापुर विकास आघाडीचे सदिंप पारेख,मगेश येवले जितु अहिरे,नितीन देसाई उपस्थित होते.