हिंदू आघाडीतर्फे अबु आझमी यांचा निषेध

0

पुणे । इस देश मे अगर रहना होगा, वंदे मातरम् कहना होगा… अबु आझमी आणि वारीस पठाण यांचा निषेध असो… अशा घोषणा देत हिंदू आघाडीतर्फे वंदे मातरम् न म्हणणार्‍यांचा रविवारी निषेध करण्यात आला.

वंदे मातरम् न म्हणणार्‍यांना भारतात राहण्याचा अधिकार नसून त्यांना पाकिस्तानात पाठवायला हवे, अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांमधून उमटत होत्या. हिंदू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी येरवडा येथील पर्णकुटी पोलीस चौकीसमोर हे निषेध आंदोलन केले. यावेळी आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, विश्व हिंदू संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष हेमेंद्र जोशी, अ‍ॅड. मोहनराव डोंगरे, येरवडा विभागप्रमुख बाळासाहेब विश्वासराव, आशिष वरगंटे, किसन पाटील, अशोक चव्हाण, अनिल झेंडे, स्वामी चिल्वेरी, सूरज रजपूत, संतोष गायकवाड यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. वंदे मातरम् न म्हणणार्‍यांना पाकिस्तानात पाठवायला हवे, असे एकबोटे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी सनातन संस्था व शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.