हिंदू एकता दिंडीत ऐक्याचे दर्शन

0

जळगाव। हिंदू जनजागृती समितीच्या अभियानातंर्गत शनिवारी 27 मे रोजी शहरात हिंदु एकता दिंडी चे आयोजन करण्यात आले होते. जळगावात होणार्या दिंडी निम्मिताने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण संचारले होते. हिंदू एकतादिंडी चे स्वागत करण्यासाठी विविध संस्था,समूहाच्या वतीने विविध परिसरात स्वागत करण्यात आले. जळगावातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि संप्रदाय हे दिंडीत सहभागी झाले होते. सनातन संस्थेचे संस्थापक जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिम्मित हिंदूएकता दिंडीचे आयोजन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राज्यभर करण्यात आले होते. हिंदू एकता दिंडीला 11 शंखफुकून निनाद करण्यात आला. धर्मध्वजाचे पूजन पत्रकार हेमंत अलोणे,महापौर नितीन लढा यांनी केले. तर गोमातेचे पूजन सुशील अत्रे ,शं कोगटा यांच्या हस्ते करण्यात आले. नेहरू चौकातून रणरागिणी वेशातील युवतींनी शौयत्व जागृत करणारे शिवकालीन प्रात्यक्षिक तलवारबाजी,दाणपटा,लाठी काठी आदी सादरीकरन करण्यात आले.

शहराच्या मुख्य मार्गावरुन दिंडीचे मार्गक्रमण : दिंडी नेहरु चौक, टॉवर चौक,चित्रा चौक,शिवाजी महाराज स्मारक,बिग बाजार परिसरात दिंडीचे रुपांतर विराट सभेत झाले. ठीक ठिकाणी फुलाचा वर्षाव आणीन धर्मध्वजाच्या पूजनाने स्वगात करण्यात आले. नागरिकांच्या प्रचंड सहभागाने रस्ते पूर्ण जम झाले होते.

मंडळे ,संप्रदायांनी घेतला सहभाग
27 मे रोजी सायंकाळी 5 वाजता नेहरु चौकातून हिंदू एकता दिंडीला सुरुवात करण्यात आली.संप्रदायामध्ये श्री गजानन महाराजांची पालखी, श्री स्वामी समर्थ संप्रदायाची पालखी, योग वेदांत समितीचा चित्ररथ तसेच भजनी मंडळे सहभागी झाले होते. हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संघ परिवारातील बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, श्रीशिवप्रतिष्ठान, शिवबा प्रतिष्ठान, वासुदेव जोशी समाज युवा फाउन्डेशन, युवा शक्ती फोडेशन, पाळधी येथील शिवझेप संघटना, वाघोदा (तालुका रावेर) येथील हिंदवी स्वराज्य सेना आदी जिल्ह्यातील अनेक संघटना उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. त्याच बरोबरच लेझिम पथके, बालकक्ष, त्याचबरोबर अनेक विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमाचे सादरीकरण दिंडीत करण्यात आले. धर्मसंस्कृती प्रेमीनी हिंदूएकता दिंडीत सहभाग नोंदविला होता.

मान्यवर होते उपस्थित
भगवे फेटाधारी महिला, युवतीचे लेझीम पथक, तुलसी पथक व हिंदुराष्ट्राच्या कल्पनेतील चित्ररथ दिंडीत होते. यावेळी सनातनचे नंदकुमार जाधव,राज्य संघटक सुनील धनवर, पत्रकार हेमंत अलोणे,शिवसेनेचे गजानन मालपुरे,यांच्या सह शेकडोच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. दिंडी नंतर सभेत रुपांतर झाले. यावेळी हिंदू समाजासाठी समर्पित होण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. सभेदरम्यान असंख्य हिंदू समाजबांधव उपस्थित होते.