चोपडा। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने चोपडा शहरात आज श्री हनुमान जयंती निमित्ताने नामदिंडी काढण्यात आली. प्रथम समता नगरमधील दक्षिण मूखी हनुमान मंदिरात हनुमान चे पूजन करण्यात आले. गुजराथी वाडी येथील साप्ताहिक धर्मसत्संग मधील महिलांच्या हस्ते हिंदू धर्माचे प्रतीक हिंदू धर्मध्वज पूजनाने करण्यात आले. त्यानंतर नामदिंडी समता नगर, बारीवाडा, थाळनेर दरवाजा, गोल मंदिर मेनरोड मार्गे नामदिंडी सांगता छत्रपती शिवाजी चौकातील बालवीर हनुमान मंदिरात सांगता करण्यात आली. नामदिंडी श्री हनूमते नमः या नामाचा गजर होत असल्यामुळे संपूर्ण नामदिंडी चैतन्य निर्माण झाले. या नामदिंडीत बालवीर हनूमंताप्रमाने धर्म प्रसाराची कास धरून समितीच्या नामदिंडी सहभागी झालेला बालवीर भावेश शिंपी या नामदिंडी आकर्षण होते.
मेघूराया मित्र मंडळ व स्वराज्य निर्माण सेनाचा उपक्रम
श्री हनुमान जयंती निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूण्यतिथी असल्याने महाराजांना मानवंदना देण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र व धर्म रक्षणाचा कार्यात चोपडा येथे मेघूराया मित्र मंडळाच्या व स्वराज्य निर्माण सेनाचा धर्माभिमानी हिंदूंचा सदैव सक्रिय सहभाग असतो. यावेळी सनातन संस्थेचे अनिल पाटील, अशोक पाटील हिंदू जनजागृती समितीचे, सूधाकर चौधरी, भालचंद्र राजपूत, रामकृष्ण चौधरी, रोकड बालाजी मंदिर संस्थानचे पंडित आलोक महाराज, मेघूराया मित्र मंडळाचे राहुल माळी, डिगंबर माळी यासह सर्व धर्माभिमानी हिंदू तरूण व हिंदू रणरागिणी उपस्थित होते.