हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा संपन्न

0

निगडी : संस्कृती संवर्धन व विकास महासंघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी यांच्या समन्वयाने गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष शोभायात्रा काढण्यात आली होती. या उपक्रमाचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते. या शोभायात्रेत फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये प्रभू श्रीरामाची प्रतिमा आणि हिंदू धर्मग्रंथ ठेवण्यात आले होते. या शोभायात्रेची सुरुवात गिरीराज गणपती मंदिरापासून झाली. ही शोभायात्रा पुढे बिजलीनगर चौकमार्गे गुरुद्वारा चौक, ममेली मंगल कार्यालय, चिंतामणी गणेश मंदिराजवळ आली. तेथे महाआरती होऊन शोभायात्रेची सांगता करण्यात आली. शोभायात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना चिंतामणी गणपती मंदिरातर्फे प्रसाद वाटप करण्यात आले.

ढोल-ताशा पथकांनी आणली रंगत
या शोभायात्रेत सरस्वती बँड पथक, आळंदी येथील वारकरी पथक, भक्ती-शक्ती चित्ररथ, हिंदुस्थानातील थोर महापुरुषांचा चित्ररथ, नादवेद संगीत अकादमीचे गायन चमू, तसेच आरंभ ढोल-ताशा पथक यांनी रंगत आणली. जागो जागी रांगोळ्यांनी शोभायात्रेचे स्वागत नागरिकांनी केले. शोभायात्रेत सामील झालेल्या नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा आणि भगवे फेटे परिधान केल्यामुळे वातावरण प्रफुल्लित झाले होते.

शोभायात्रेत मान्यवरांचा सहभाग
या शोभायात्रेसाठी प्रभागातील विविध सेवाभावी संस्था, नाद वेध संगीत अकादमी, संत मौनी बाबा वृद्धाश्रम-गुरुद्वारा, नचिकेत बालग्राम आश्रम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, धर्मजागरण समिती, चिंतामणी मित्र मंडळ, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचे कार्यकर्ते, सरदार व÷ल्लभभाई पटेल युवा मंच-शिवनगरी, एकवीरा सेवा संघ यांनी सहकार्य केले. नगरसेवक नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, करुणा चिंचवडे, बाळासाहेब ओव्हाळ, मोरेश्वर भोंडवे, संगीता भोंडवे, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, दिलीप जोशी, राजकुमार काळे, संतोष जाधव, बिभीषण चौधरी, दिलीप गडदे, श्रेयस ठाकरे, अभिजीत बोरसे, भास्कर भोर उपस्थित होते.