हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

0

मुक्ताईनगर । हिंदू हृदयसम्राट व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पाचव्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेनेतर्फे शहरात विविध सामाजिक कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. शहराच्या मुख्य चौकामध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व शिवसैनिकांकडून करण्यात आले. त्यानंतर शिवसेना कार्यालय येथे प्रतिमापूजन करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले व संपूर्ण विधानसभा मतदार संघामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख छोटू भोई, सुनील पाटील, अ‍ॅड. मनोहर खैरनार, प्रशांत भालशंकर, अफसर खान, राजेंद्र हिवराळे, राजेंद्र तळेले, अमरदीप पाटील, छोटू पाटील, नामदेव भील, सचिन पाटील, पंकज राणे, गणेश टोंगे, बबलू वंजारी, प्रविण चौधरी, संतोष कोळी, चंद्रकांत मराठे, महेंद्र मोंढाळे, किरण कोळी, साबीर पटेल, नरेंद्र सापधरे, शुभम तळेले, प्रफुल्ल पाटील, डॉ. सुनील देवरे, सागर कोळी, नितीन कांडेलकर, शुभम शर्मा, आनंदा ठाकरे, साबीर शेख यांसह असंख्य शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.