धानोरा । जगात जाती धर्मांपेक्षा माणुसकी हा फार मोठा धर्म असून तो टिकविणे काळाची खरी गरज आहे, असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी व्यक्त केले. धानोरा येथे आयोजित इफ्तार पार्टीमध्ये ते बोलत होते. मुस्लीम बांधवासाठी अतिशय पवित्र मानला जाणारा रमजान महिना आणि त्यात त्या बांधवाकडून पाळले जाणारे कडक उपवास ( रोेजे ) हे देखील आर्दश उदाहरण आहे, भुकेल्याला अन्नाची खरी किंमत कळत असते, त्यामुळे दिवसभर उपाशी रहाणे फार कठीण काम आहे. हिंन्दू – मुस्लीम असा भेदभाव न करता येणारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यांची होती उपस्थिती
येथील माजी ग्रा. प. सदस्य, रज्जाक तडवी, धानोरा विकास सोसायटीचे चेअरमन राजू मुशिर तडवी तसेच मुस्लीम पंचकमेटीतर्फे ईप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जि. प. चे आरोंग्य सभापती दिलीप पाटील, उद्योग पती आशिष गुजराथी, माजी उपसभापती माणिकचंद महाजन, दोडे गुजर समाजाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, पंचायत समिती सदस्य बापू खैरनार, कबिर खान, अब्बास खान, सुतगिरणी संचालक हितेंद्र पाटील, उपसरपंच अशोक साळुंखे, पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन जगतराव पाटील, ग्रा.पं सदस्य, कैलास महाजन, शिवदास पाटील, तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, लासुर उपसरपंच वाघ, मुस्लीम कमेटीचे अध्यक्ष हाजी नईम शेठ, पोलिस पाटील दिनेश पाटील, अशोक टेलर, एस.पी. महाजन, रविंद्र महाजन, वसंत पाटील, मासुम तडवी आदी उपस्थीत होते.