हिंमत असेल तर कॉंग्रेसने राजीव गांधींच्या नावावर मत मागावे ; मोदींचे खुले आव्हान

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा मृत्यू ‘भ्रष्ट्राचारी नंबर वन’ म्हणून झाल्याचे आरोप केले होते. त्यावरून रणकंदन माजले आहे. एका दिवंगत पंतप्रधानांबद्दल मोदींनी केलेले हे विधान निषेधार्ह असल्याचे म्हणत विरोधकांनी मोदींवर हल्लाबोल केला, मात्र मोदी त्यांच्या विधानावर ठाम असून त्यांनी कॉंग्रेसने राजीव गांधी यांच्या नावावर मत मागून दाखवावे असे खुले आव्हान दिले आहे. जर राजीव गांधी हे शुद्ध चारित्र्याचे होते, तर कॉग्रेस त्यांच्या नावावर मत का मागत नाही? असा सवाल मोदींनी केला आहे. एका दैनिकाला मोदींनी मुलाखत दिली त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसला खुले आव्हान दिले आहे.

मी ह्यात नसलेल्या पंतप्रधानांबद्दल बोललो तर कॉंग्रेसला हे झोंबले, मात्र राहुल गांधी रोजच विद्यमान पंतप्रधानाला शिव्या घालतात. त्याचे कॉंग्रेसने आत्मचिंतन करावे असेही मोदींनी सांगितले.