हिंमत असेल तर भाजपने पुन्हा लोकसभा निवडणूक घ्यावी; शरद पवारांचा पलटवार !

0

मुंबई : भाजपकडून वारंवार महाविकास आघाडीचे सरकार अधिक काळ टिकणार नसल्याचे भाष्य केले जात होते. यावर मुख्यमंत्र्यांनी भाजपला हे सरकार पाडून दाखवाच असे आव्हान दिले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या असे सरकारला आव्हान दिले होते. आता यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. फक्त राज्याची विधानसभा निवडणूक कशाला घेता? पूर्ण देशाचीच घ्या, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भीमा कोरेगाव, एल्गार परिषदेवर देखील भाष्य केले.