राज ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुले आव्हान
मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतात बाहेरुन येणार्याला कानडी शिकावीच लागेल, आपल्या मुख्यमंत्र्यांची हिंमत आहे का? असा सवाल करित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यासह अनेकांचा चांगलाच समाचार घेतला.नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावा, अशी सणसणीत टीका देखिल यावेळी केली.
रंगशारदा सभागृहात पदाधिकारी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतल्याने खडे बोल सुनावले आहेत. मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही असा टोला यावेळी राज ठाकरे यांनी लगावला आहे.महाराष्ट्रासाठी जागता पहारा देणं आमचं काम आहे. आज हात जोडून बोलतोय, हात सोडायला लावू नये. अनधिकृत बसणार्या फेरीवाल्यांकडून भाजी घेणं बंद करा असं आवाहनही यावेळी केले.फआमचा गिरणी कामगार घरासाठी झगडत राहणार आणि बाहेरुन येणा-यांचा झोपडपट्ट्यांना एक कोटी रुपये देणार आणि घरही देणार. प्रत्येक राज्य आपल्या लोकांसाठी काम करत असतं, पण आपल्याकडे सगळ्यांचे हात दगडाखाली आहेत. आम्ही जेव्हा जाब विचारतो तेव्हा आम्हाला तुम्ही शिव्या घालताफ, असं राज ठाकरे बोलले.
रस्त्यावर काय करावे हे नाना पाटेकरांनी शिकवू नय!
ममहात्मा नाना पाटेकर आज काहीतरी बोललेत ? नाना पाटेकर बोलताना 80 वर्षाच्या आजोबांचा एक टोन असतोफ, अशी टीका करताना राज ठाकरेंनी नाना पाटेकरांची नक्कलही करुन दाखवली. मवेलकममध्ये भाजा विकत होता ना, त्यामुळे फेरीवाल्यांचा पुळका आहेफ, अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी केली.
नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावं. नाना पाटेकर मराठीतला उत्तम कलावंत आहे, तुमचे चित्रपट बघू…पण नको त्या गोष्टीत पडू नकाफ, असं राज ठाकरे बोलले आहेत.’मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाहीफ, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
पोलिसांनी कधीतरी आमची बाजू घ्यावी
भाषणाची सुरुवात करतानाच राज ठाकरे यांनी आंदोलनात ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, ज्यांच्यावर केसेस पडल्या, त्या सर्वांचं अभिनंदन केले. मराठी माणसांसाठी आम्ही कितीही केसेस घेऊ असे राज ठाकरेंनी सांगितले. पोलिसांनी आमचं संरक्षण करायचं, तर आमची मुलं जाऊन पोलिसांचं संरक्षण करत आहेत. आम्ही नेहमी पोलिसांची बाजू घेतली आहे, आणि घेत राहू. पण त्यांनीही कधीतरी आम्हाला डोळा मारावा असं सांगत राज ठाकरेंनी पोलिसांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
फेरीवाल्यांच्या मुद्यावर बोलताना बसण्याचा पहिला अधिकार मराठी माणसाचा आहे. बाहेर आलेल्यांचा पुळका कशासाठी? मफेरीवाला जर गरिब असेल तर रोज रेल्वेने प्रवास करणारे 60-70 लाख लोक गरिब नाहीत का ? तो देखील पैसे कमावतो. फेरीवाल्याप्रमाणे आमचा नोकरी करणारा माणूस 100 रुपये हफ्ता देऊ शकतो का ?
-राज ठाकरें
उच्च न्यायालयाचे केले अभिनंदन
यावेळी राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांसंबंधी दिलेल्या निर्णयावरुन उच्च न्यायालयाचं अभिनंदन केलं. त्यांनी पदाधिका-यांना आवाहन केलं आहे की, माझं पत्र आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत घेऊन प्रत्येक पोलीस स्टेशन, वॉर्ड ऑफिसर आणि रेल्वे मास्तरकडे द्यायचं. परत तर तिथे फेरीवाले बसले तर या अधिका-यांवर न्यायालयाचा अवमान केल्याची केस टाकणार.
परप्रांतीयांचा मुद्दाही केला उपस्थित
1 मवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनेही शहरात लोंढे वाढल्याचं मान्य केलं आहे. महाराष्ट्रात यूपी-बिहारकडून दिवसाला 48 ट्रेन येतात, भरुन येतात आणि रिकाम्या जातात. कोण कुठून येतं, कुठे राहतं माहिती नाही, बॉम्बस्फोटसारख्या घटना झाल्यावर चार दिवसांसाठी जाग येते. टॅक्सी अधिकृत आहे की अनधिकृत आहे हेदेखील लोकांना माहित नाही. मराठी अधिकारी जे विष पोसत आहेत ते भविष्यासाठी घातक आहेफ, असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
2 भाषणाच्या शेवटी राज ठाकरे यांनी विभाग प्रमुख सुशांत माळवदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला. मसुशांत माळवदेवर झालेला हल्ला मी कधीच विसरणार नाही. म्हणून रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. प्रत्येक गोष्ट बोलून व्यक्त करायची नसते. चहा थंड करुन प्यायला तरी तो चहाच असतो. सर्वांनी सतर्क रहाफ, असं आवाहन करत राज ठाकरेंनी सूचक इशारा दिला आहे.