नवी दिल्ली:गलवान खोऱ्यात भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला. यात 20 भारतीय जवान शहीद झालेत. याच मुद्द्यावरून देशातील राजकारण देखील तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘Surender Modi’ असा ट्विट केला. या ट्विटचा अमित शाह यांनी चांगलाच समाचार घेतला. जर चर्चाच करायची असेल तर संसदेत या, होऊन जाऊ द्या एकदा. १९६२ पासून आजपर्यंत काय काय घडले त्यावर चर्चा करु असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांना दिले आहे. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे माजी अध्यक्ष अत्यंत घाणेरडं राजकारण करत आहेत याची मला कीव येते आहे. पाकिस्तान आणि चीनला आवडेल असे वक्तव्य काँग्रेसचे नेते करत आहेत हे खेदजनक असल्याचेही त्यांनी सांगितले.
गृहमंत्री अमित शाह यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे.