सोलापूर : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहिर झाले. त्यानंतर शिवसेनेने सामना वर्तमानपत्रातून भाजपवर टीका केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्लीतील जनतेने भाजपचा अहंकार जिरवल्याचे आरोप केले होते. त्याला आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे जणू काय तेच जिंकल्याचा अविर्भावात बोलत आहे अशी टीका केली. शिवसेनेत हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात स्वतंत्र निवडणूक लढून दाखवावी असे आव्हानच चंद्रकांत पाटीलांनी दिले आहे.
शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्या पक्षाला 0.2% आणि 0.1% मते मिळाली असून भाजपला मात्र 6 टक्के मते जास्त मिळाली असल्याचे पाटील म्हणाले. देशाचे नुकसान झाले तरी चालेल मात्र भाजप जिंकता कामा नये असे सध्या राजकारण सुरू आहे असे चंद्रकांत पाटीलांनी सांगितले.