हिंस्त्र श्‍वापदांकडून पाळीव प्राण्यांचा फडशा

0

बिबट्या गवसेना ; वनविभागाने पिंजून काढली रात्र

चाळीसगाव : सात जणांचे बळी घेणार्‍या बिबट्याच्या मागावर वनविभाग असलातरी बिबट्या मात्र निसटत आहे तर दुसरीकडे पाळीव प्राण्यांवरील हल्लेदेखील थांबायला तयार नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री डोणदिगर शिवारात तीन ते चार बकर्‍यांचा फडशा पडला तर न्हावे शिवारात वासरू जखमी झाले तसेच वरखेडे रस्त्यावरील हल्ल्यात बकरी जखमी झाले. बिबट्याने हे हल्ले मात्र केले नसल्याचे व हिंस्त्र श्‍वापदाने ते केल्याची माहिती आहे. दरम्यान, पिंपळवाड म्हाळसा परीसरातील दिनेश शंकर पाटील यांच्या शेतात शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास बिबट्या असल्याची वार्ता धडकताच वनविभागाचे पथक तसेच शार्प शुटर नवाब खान, वनपरीक्षेत्र अधिकारी पवार तेथे धडकले मात्र बिबट्या निसटला. वनविभागाला या जागेवर बिबट्याचे पगमार्ग आढळले आहेत.

घराबाहेर न झोपण्याचे आवाहन
बिबट्याकडून होणार हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर वनविभागाने नागरीकांना घराबाहेर न झोपण्याचे आवाहन केले आहे शिवाय ग्रामीण भागात दवंडी पिटवून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाधीत गावांमध्ये जनजागृतीपर भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. 8 रोजी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूरचे एम.के.राव यांनी वरखेडे बेस कॅम्पला भेट देत आढावा घेतला. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी बंग्लोर तसेच सिल्लोड (औरंगाबाद) येथून आणखी शार्प शुटर मागवण्यात येणार असल्याचे सांगणत आले.