हिंस्त्र श्‍वापदाच्या हल्ल्यात सात बकर्‍यांचा मृत्यू

0

बिबट्यानेच हल्ला केल्याचा ग्रामस्थांना संशय

चाळीसगाव । प्रतिनिधी । नरभक्षक बिबट्याच्या मागावर वनविभाग असतानाच दररोज त्याचे या परीसरात दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सहा जणांच्या बळी गेल्यानंतर बिबट्याला पकडण्यात वा ठार मारण्यात वनविभागाला यश आले नसतानाच गुरुवारी मध्यरात्री तालुक्यातील तरवाडेनजीक हिंस्त्र प्राण्याने सात बकर्यांवर हल्ला चढवत त्यांचा फडशा पाडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

हिंस्त्र श्‍वापदाने हा हल्ला चढवला असल्याचे बोलले जात असलेतरी काही ग्रामस्थांनी मात्र हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याची माहिती दिली. वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी मात्र हा हल्ला बिबट्याने नव्हे तर हिंस्त्र श्‍वापदाने केला असल्याची माहिती दिली. बिबट्या आपली शिकार मानेला चावा घेऊन करतो तर या घटनेत बकर्‍यांच्या पोटावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.