बिबट्या किंवा वाघिणीचा पिल्लांसोबत वावर असल्याच संशय
ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण
नवापूर – वावडी शिवारात बिबट्याचा संशयाने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. याबाबत येथील ग्रामस्थ जितेंद्र वेच्या गावीत यांनी दिलेल्या माहितीनुसार २५ जानेवारीचा मध्यरात्री मानसिंग हरी पाडवी यांचा शेतातील पाळीव प्राण्यांनवर बिबट्याने हल्ला करून येथे उभे असलेले एक गाय व एक बैल यांना जखमी आवस्थेत अर्धवट खालेल्या स्थितीत सोडून निघून गेला. गायीचा मृत्यू झाला आहे, याबाबत येथील गावकऱ्यांनी वनविभागाला सदर घटनेची माहिती दिली माहीती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत त्यांनी गायीचा अर्धवट खालेला मृतदेह त्याच ठिकाणी कायदेशीरक्रिया करून पूरविण्यात आले.
गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
गावकऱ्यांना खबरदारी म्हणून रात्री घरात राहण्याचा सल्ला दिला. याबाबत गावकऱ्यांनी आधीक माहीत देतांना सांगीतले की, रात्री आंधार आसल्याने वेवस्थीत दिसत नसले तरी रात्र झाल्यावर जी डरकाळी ऐकू येते. त्यावरू तो बिबट्या नसून वाघीण असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. दरम्यान सहा महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याला शेतात तीन बछडे सापडले होते. या बछडयाची माहिती वनविभागाला देवूनही या गांभीर्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हेच बछडे आता मोठे झाल्याने त्यांनीच गाय व बैलाची शिकार केल असेल असे तर्कवितर्क काढण्यात येत आहे. गेल्या ४ दिवसांपासून पासून कमालीचे दहशदीचे वातावरण आसून वनविभागाला मात्र याचे गांभीर्य लक्षात येत नाही जर काही जिवीत हानी झाली तर यास सर्वस्वी वनविभागच जबाबदार राहील, असे गावकरी मनोहर प्रताप गावीत, दिवांजी जेखू गावीत, लतीप रामदास गावीत, सूरेश कांत्या गावीत, रमण गावीत, पोलीस पाटील विष्णू विक्रम गावीत, अशोक जयराम गावीत यांनी सांगितले.