हिकेनप्रकरणी न्यायालयाने बीसीसीआयला झापले

0

मुंबई । केवळ ऐकीव माहितीच्या आधारे एखाद्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लावणे आणि त्याला निलंबित करणे योग्य नाही या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट बोर्डाला धारेवर धरत मुंबईकर क्रिकेटपटू हिकेन शहाचे म्हणणे ऐकून घेण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईचा फलंदाज असलेल्या हिकेन शहाला जुलै 2015मध्ये बीसीसीआयने निलंबित केले आहे. खेळाडूंसाठी असलेल्या भ्रष्टाचारविरोधी आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

हिकेनने यासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली आणि निलंबनाला आव्हान दिले. आपल्याला यासंदर्भात बाजू मांडण्याची संधीच दिली गेली नाही, असा दावा त्याने केला. त्याने बीसीसीआयला पत्र पाठवून आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याचीही विनंती केली. हिकेनच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा न्यायाधीश एस.एम. केमकर व जी. एस. कुलकर्णी यांनी सांगितले की, हिकेन शहाविरोधात एकाही साक्षीदाराची उलटतपासणी बीसीसीआयने घेतलेली नाही. शिवाय, यासंदर्भात अंतिम निर्णयही त्यांनी घेतलेला नाही.