जवळपास तीन वर्षांनंतर अभिनेत्री राणी मुखर्जी ‘हिचकी’ या सिनेमाद्वारे पुनरागमन करते आहे. या चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर नुकताच एक फोटो राणीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीचे हे फोटोशूट होते. यामधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमधील राणीचा लूक थक्क करणारा आहे. फोटोग्राफर अविनाश गोवारीकरने राणीचे हे फोटोशूट केले आहे. २०१४ साली ’मर्दानी’ या चित्रपटात राणी मुखर्जीने एका धाडसी पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली होती. २०१५ साली राणी आणि आदित्य चोप्राच्या आयुष्यात एका गोंडस परीचे आगमन झाले. त्यानंतर राणी काही काळ सिनेमांपासून दूर राहिली. पण आता पुन्हा नव्या जोमाने ती पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे.