नवी दिल्ली : भारतीय सुरक्षा रक्षकांनी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या शाहीद अहमद वानी यास जम्मू-काश्मीरमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 चिनी बनावटीचे पिस्तूल, 9 जिवंत काडतुसे आणि एक मॅगेझिन जप्त केली आहे.
सुरक्षा दलांची मोठी कारवाई
काश्मीरमधील शोपिअन जिल्ह्यातील झैनापोरा गावचा रहिवासी असणार्या शाहीद वानीला पकडण्याची ही मोठी कारवाई असल्याचे मानण्यात येत आहे. हिज्बुलचा कमांडर यासिनला कंठस्नान घातल्यानंतर चकमकीदरम्यान भारताचे पाच जवानही जखमी झाले होते. दोन दहशतवाद्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या. तर इतर दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. ही चकमक गेल्या आठवड्यात शनिवारी संध्याकाळी सुरु झाली, ती दुसर्या दिवशी रविवारी दुपारपर्यंत सुरु होती. स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरुन सुरक्षा रक्षकांनी ही मोहिम फत्ते केली होती.