हिटमॅन, विराटचा आयसीसीकडून सन्मान; विशेष पुरस्कारासाठी निवड !

0

नवी दिल्ली: भारताचा हिटमॅन रोहित शर्मा याची आयसीसी ‘वनडे क्रिकेटर ऑफ द इअर २०१९’ तर कर्णधार विराट कोहली याची ‘स्पिरीट ऑफ क्रिकेट’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मासाठी २०१९ हे वर्ष शानदार ठरले होते. गेल्या वर्षी रोहितने वनडे, कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये १० शतक झळकावली होती. यापैकी ५ शतक ही इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत केली होती. आयसीसीने विराटला स्पिरिट ऑफ क्रिकेट हा पुरस्कार दिला आहे. या पुरस्काराची घोषणा करताना आयसीसीने विराटचा वर्ल्ड कप स्पर्धेतील एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.