हिटलरच्या शॉर्ट्सचा होणार लिलाव

0

जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याच्या बॉक्सर शॉर्ट्सचा (अर्धी चड्डी) अमेरिकेत लिलाव होणार असून, त्याला 5000 डॉलर किंमत मिळण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेतील अ‍ॅलेक्झांडर हिस्टॉरिकल ऑक्शन्स ही संस्था या चड्डीचा लिलाव करणार आहे. पांढर्‍या चट्ट्यापट्ट्याची ही चड्डी 19 इंच लांब असून, तिची कंबर 39 इंच आहे. तिच्यावर ए. एच. असे हिटलरचे आद्याक्षरही आहेत, असे लिलाव संस्थेने म्हटले आहे.

हिटलर हा 3 व 4 एप्रिल 1938 साली ऑस्ट्रियातील पार्क हॉटेल ग्राझ येथे थांबला होता. त्यावेळी त्याची ही चड्डी तेथेच राहून गेली होती. स्वतःला पार्क हॉटेल ग्राझच्या मालकाचा नातू असल्याचा दावा करणार्‍या एका व्यक्तीने नोटरी केलेल्या पत्रासोबत ही चड्डी पाठवली आहे. हा लिलाव 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यात हिटलरने स्वाक्षरी केलेली दुर्मीळ अशी माईन काम्फ या त्याच्या आत्मचरित्राची प्रतही विकण्यात येईल. याशिवाय हिटलरची आद्याक्षरे असलेला पांढरा शर्ट आणि त्याचा पृथ्वीचा गोल यांचाही लिलाव केला जाईल.