जळगाव। येथील श्री. क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था, परिशिष्ट 1 चे प्रमुख विश्वस्त तुकारामशेठ निकुंभ यांचे नेतृत्वाखाली दि. 21 शुक्रवारी श्री संत शिरोमणी नामदेव पुण्यतिथी महोत्सवनिमित्त सकाळी 9 वाजता पालखी सोहळ्यास संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर शिंपी समाजाचे मनोरमाबाई जगताप मंगल कार्यालय येथून पालखी मिरवणूक निघणार आहे.संत शिरोमणी नामदेव महाजन यांच्या मुर्तीचे पूजन उत्सव समिती अध्यक्ष दिपक निकुंभ सहपत्निक मूर्तीचे पूजन करतील. तद्नंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचेसह पिपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, अॅड. विजय पाटील, सौ. सिमा भोळे हे मान्यवर उपस्थित राहणार आहे.
यांची राहील उपस्थिती
बालाजी मंदिर येथे पालखीचा समारोप होवून बालाजी मंदिर येथे दुपारच्या सत्रात विद्यार्थी गुणगौरव व वह्या वाटप तसेच संस्थेचे सी.ए. रविंद्र खैरनार, यांना डॉक्टरेट पदवीबद्दल सत्कार समारंभ आयोजित केला आहे. कार्यक्रमास डॉ. राजेंद्र फडके, आ. सुरेश भोळे, आ. चंदुभाई पटेल, नरेंद्रअण्णा पाटील, अॅड. सुभाष चव्हाण, बंडुदादा काळे, पो.नि. प्रवीण वाडीले, रामकृष्ण शिंपी, दिलीप भांडारकर, सुरेशशेठ कापुरे, सतिश पवार, श्रीमती अंजनाताई जगताप, युवा प्रतिनिधी विवेक जगताप, पी.पी. शिंपी चंद्रकांत जगताप, गणेश मेटकर, अरुण मेटकर, मोहन चव्हाण, दिलीप भामरे, नाना कापडे, पद्माकर जगताप, शैलेंद्र भांडारकर, नितीन सोनवणे, सौ. अंजली बाविस्कर, मनोज भांडारकर, राजेश जगताप, सुजित जाधव यांची उपस्थिती लाभणार आहे. समाजबांधवांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन महोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.