हिदी भाषा ही भारतातील बहुसंख्य लोकांना जोडण्याचे काम करते व आधुनिक काळात हिंदी राष्ट्रभाषा आहे . प्रा एम डी खैरनार
यावल ( प्रातिनिधी) येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी विभागाअंतर्गत हिंदी साप्ताहिक चे उद्घाटन व काव्यवाचन स्पर्धा संपन्न झाली.
सदर महाविद्यालया च्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील व प्रा.एम.डी.खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले . प्रा.ए.पी.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हिंदी भाषेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भाषेचे ज्ञान आवश्यक असते व स्पर्धा परीक्षा मध्ये हिंदी भाषेचा वापर केला जातो. असे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.एम.डी.खैरनार यांनी हिंदी भाषेचे महत्व पटवून दिले. हिंदी भाषा ही भारतातील बहुसंख्य लोकांना जोडण्याचे काम करते व आजच्या आधुनिक काळात राष्ट्रभाषा हिंदी ही विश्वभाषा हिंदी झाली आहे. असे मार्गदर्शन केले.
महाविद्यालयामध्ये हिंदी काव्यवाचन स्पर्धेत ०६ विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला. या काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.एस.पी. कापड़े,प्रा.रजनी इंगळे व प्रा.निर्मला पवार यांनी काम पाहिले. या स्पर्धेत प्रथम नेहा संजय सोनवणे (एफ वाय बी ए), कुमुद विश्वास भालेराव (एफ वाय बी एस्सी व संध्या समाधान कोळी (टी वाय बी कॉम ) या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. पी. व्ही. पावरा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा रावते तर आभार प्रा. रजनी इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.