नंदुरबार- लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे, प्रकाशा येथील गुजर समाजातील एका विवाह समारंभात देखील खासदार डॉक्टर हिना गावित यांना भाषणबाजी करण्यासाठी लोकांनी मज्जाव केल्याची घटना दिनांक 20 एप्रिल रोजी घडली. मराठा समाज, आदिवासी समाज, यांच्यासह अन्य घटकांनी खासदार हिना गावित यांच्या कार्यपद्धतीवर उघड उघड नाराजी व्यक्त करून विरोध दर्शवला आहे.
महायुतीचा धर्म मजबुरीने निभवण्यासाठी एक पाऊल पुढे सरकलेल्या शिवसेनेने देखील त्यांच्या प्रचारावर बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उगारले आहे, ही घटना ताजी असतानाच दिनांक 20 एप्रिल रोजी भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार हिना गावित यांना प्रकाशा येथे माईकवर बोलण्यास लोकांनी मनाई केल्याची घटना घडली, प्रकाशा येथे गुजर समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता, या वेळी समाजाचे नेते दीपक बापू पाटील यांचे अध्यक्षीय भाषण संपले असताना पुन्हा भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन शब्द बोलण्याचा गळ घातला, मात्र प्रोटोकॉल नुसार अध्यक्ष भाषण संपल्यानंतर कुणाला बोलता येत नाही यावर बोट ठेवत गुजर समाजातील लोकांनी हिना गावित यांना या ठिकाणी राजकारण आणू नका असे सांगत बोलण्यास मज्जाव केला, त्यामुळे याच विवाह सोहळ्यात भाजपा व काँग्रेस गटातील दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून आला, एकंदरीतच लोकसभा निवडणुकीतील भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार हिना गावित यांना या ठिकाणी अपमानीत होण्याची वेळ आली, सामाजिक स्तरावर खा,हीना गावित यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने भाजपाच्या गोटात गोंधळ उडाला आहे,