गोल्ड कोस्ट – २१ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यामध्ये अजून एक सुवर्ण जमा झाले आहे. हिना सिद्धूने 25 मीटर पिस्टल प्रकारामध्ये हे सुवर्ण पदक पटकावले आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारताला 11 सुवर्णपदके मिळाली असून भारत तिसऱ्या स्थानी आहे. त्यापूर्वी भारताच्या पुरुष हॉकी संघाने मलेशियाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.