नवी दिल्ली । आपल्याला आयुष्यात जोडीदार भेटणारच नाही, आपण कसे दिसतो, आपल्याला समजून घेणारा, शोभून दिसणारा जोडीदार या जगात तरी असेल का? असे अनेक प्रश्न लग्नाच्या वयात आलेल्या तरुणांना पडलेले असतात. यामुळे एका वेगळ्या चिंतेत त्यांचे आयुष्य सुरू असते. पण म्हणतात ना जोड्या या स्वर्गातच बनलेल्या असतात. हो. याचाच प्रत्यय नुकताच राजेश कुमारला आला आहे.
राजेश कुमारचे वय वर्षे 34 झालं. तो एका सरकारी नोकरीत आहे. प्रत्येक तरुणाप्रमाणे राजेशलाही प्रेम, लग्न करण्याची इच्छा होती. पण दुखणं असे होते की इतरांपेक्षा राजेश थोडा वेगळा आहे. त्याची उंची केवळ अडीच फूट एवढी आहे. वयात आल्यानंतर, समज आल्यापासूनच हे दु:ख त्याला सलत होते. आपल्या कोणीच जोडीदार मिळणार नाही हे त्याच्या मनात पक्के झाले होते. याचे दु:ख त्याला आयुष्यभर सलत होतं, पण ते फार काळ टिकले नाही. कारण जसे जगात प्रत्येकासाठी देवाने कोणी ना कोणी निर्माण केले आहे, हेच खरे ठरले. राजेशची जीवनगाठ देवाने आधीच स्वर्गात बांधली होती. राजेशचा नुकताच शैलजाशी विवाह पार पडला. शैलजाही त्याच्याच एवढ्या उंचीची आहे. हिमाचल प्रदेशमध्ये या दोघांचा विवाह पार पडला. त्यामुळे या विवाहानंतर शैलजा आणि राजेश हे दांपत्य भारतातले सगळ्यात ठेंगणे जोडपे ठरले आहे. शैलजाने माझ्या आयुष्यात येऊन माझ आयुष्य पूर्ण केले आहे. त्यामुळे शैलजाचा पत्नी म्हणून स्वीकार करताना मी खूप आनंदित आहे. आम्ही दोघे एकमेकांसाठीच बनलो आहोत, अशी प्रतिक्रिया राजेश कुमार याने लग्नानंतर माध्यमांना दिली. मला माझ्या मनासारखा आणि शोभणार जोडीदार मिळाल्याने मी आणि माझी फॅमिली आम्ही सर्व आनंदित आहोत असे शैलजाने यावेळी सांगितले.