हिमाचल। देशातील अनेक भागात स्थिरावलेल्या पावसाने हिमाचल प्रदेशातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी जोरदार पाऊस झाला आहे. तथापी आधीच्या पावसामुळे बंद करण्यात आलेला मनाली-लेह मार्ग वाहनांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. तर जोधपूर, मणिपूरसह काही भागामध्ये पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गुजरात आणि राजस्थानमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नसून राज्यातील काही भागात नागरिक पावसामुळे संकटात सापडले आहेत.
राजस्थानमध्ये पर्जन्यवृष्टी
राजस्थानमध्ये कोसळणार्या पावसाने रविवारी सायंकाळपर्यंत जोधपूर, उदयपूर, भरतपूर, जालौर, पालीसह काही शहरांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. जोधपूरमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, पाण्याच्या प्रवाहामध्ये दुचाकी वाहून गेल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत.