हिम्मत असेल तर विरोधकांनी या दोन मुद्द्यांचा घोषणापत्रात समावेश करावा; मोदींचे आव्हान

0

जळगाव: ५ ऑगस्टला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर राज्यातील कलम ३७० रद्द केले. याला कॉंग्रेससह काही विरोधी पक्षाने विरोध केला. परंतु कॉंग्रेसमध्ये हिंम्मत असेल तर त्यांनी आम्ही रद्द केलेल्या ३७० ला पुन्हा आणण्याचे आश्वासन त्यांच्या घोषणापत्रात द्यावे असा इशारा मोदींनी दिला. जळगावात विधानसभेच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

विरोधकांनी ३७० कलम रद्द करण्यासह तीन तलाखला देखील विरोध केला आहे. त्यांच्यात हिंम्मत असेल तर त्यांनी त्यांच्या घोषणापत्रात तीन तलख पुन्हा आणण्याचा समावेश करावा असा इशाराही मोदींनी दिला.