कल्याण : कल्याण आणि डोंबिवली शहरात असलेल्या सरकारी कार्यालयात नागरिकांना दररोज कामासाठी यावे लागते. महिलांना देखील कामानिमित्त या कार्यालयात ताटकळत राहावे लागते. यात आपल्या तान्हुल्याना कडेवर घेतलेल्या माताची संख्या देखील लाक्षणिक असून या मातांना आपल्या मुलांना स्तनपान करताना अडचण येते. याबाबत स्तनदा मातांसाठी सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. याबाबत मनपा आयुक्त पी वेलारसू यांनी या मागणीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे विधानसभा सरचिटणीस प्रवीण मुसळे यांनी दिली.
कल्याण स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात असलेली महापालिका, रेशनिंग ऑफिस, आर टीओ, तहसील, पोलीस स्टेशन, न्यायालय, रेल्वे स्टेशन, यासारख्या सरकारी कार्यालयासह मॉल मध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची वर्दळ असते. अनेकदा स्तनदा मातांना तान्हुल्या बाळांना घेऊन या कार्यालयात तासनतास ताटकळत थांबावे लागते यामुळे मातणा आपल्या बाळांना स्तनपान करताना अडचण निर्माण होत असून त्यांची कुचबना होते. याबाबत राष्ट्रवादीचे कल्याण विधानसभा सरचिटणीस प्रवीण मुसळे यांनी पालिका आयुक्तांची भेट मातांना आपल्या बाळांना स्तनपान करता यावे यासाठी कमीत कमी हिरकणी कक्ष तरी स्थापन केला जावा यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी करत निवेदन सादर केले यावेळी आयुक्तांनी या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित पालिक अधिकार्यांशी चर्चा करत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे मुसळे यांनी सांगितले