चाळीसगाव। तालुक्यातील हिरापूर येथील शेतकरी महेंद्र राजाराम पांचाळ (पडवळ), सिताराम अंबर पांचाळ यांनी ब्राम्हणशेवगे रोडवरील त्यांच्या शेतात शेतीपुरक जोड व्यवसाय म्हणुन गेल्या वर्षापासुन अत्याधूनिक सोयी सुविधायुक्त पोल्ट्री फाँर्म सुरु केला. यासाठी त्यांना तब्बल सोळा लाख रुपये खर्च आला होता. मागील आठवड्यात त्यांच्या शेती परिसरात अचानक कमी दाबाचा पट्टा तयार होऊन भयंकर असे चक्री वादळ आले होते. काही क्षणात संपुर्ण पोल्ट्री शेड उध्वस्थ झाले.
शेडचे पत्रे दुर अंतरावर उडाली. घटनेचा हिरापूर येथील तलाठी सोमवंशी यांनी पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांकडून शासकीय मदतीची मागणी करण्यात येत आहे. मात्र महसुल विभागाने पंचनाम्याची औपचारिकता दाखविली असून अद्याप शासनाने दखल घेतलेली दिसत नाही. नुकसान ग्रस्त शेतकरी शासकिय मदतीची वाट पाहत आहे.