हिरापुर शिवारात गावठी दारु भट्टी उध्वस्त

0

ग्रामीण पोलीसांची कारवाई
चाळीसगाव – तालुक्यातील हिरापुर शिवारातील मोठी नदीच्या नाल्याच्या काठाला गावठी दारूची हातभट्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रतापसिंह शिकारे यांना मिळाल्यावरुन आज २५ रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे स पो नि राजु रसेडे, सहाय्यक फौजदार हिरामण तायडे, हवालदार किशोर दाभाडे, पोलीस नाईक महेंद्र साळुंखे, पो.कॉ.ज्ञानेश्वर बडगुजर, महिला पो.कॉ.सबा शेख यांनी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास छापा मारुन गैरकायदा हातभट्टीवर गावठी दारु तयार करण्यासाठीचे साहित्य त्यात गुळ नवसागर मिश्रीत कच्चे पक्के रसायन दारु तयार करण्याचे साहित्य व तयार गावठी दारुसह हिरापुर येथील ५० वर्षीय महीलेला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कारवाई करण्यात आली आहे.