चाळीसगाव। चाळीसगाव नांदगाव रेल्वे स्थानकादरम्यान हिरापूर रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे पुलाजवळ तालुक्यातील हिरापूर येथील 49 वर्षीय इसमाचा गुरुवारी 20 रोजी सकाळी 7 वाजेदरम्यान धावत्या रेल्वेखाली सापडल्याने मृत्यू झाला आहे.
हिरापूर गावाजवळील खांबा क्रमांक 318/6 ते 8 दरम्यान अप लाईनवर राजु कौतीक भानुसे (49) हे हिरापूर रेल्वेखाली आले. याप्रकरणी हिरापूर रेल्वे स्टेशन मास्तर यांच्या खबरीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला 18/2017 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र चौधरी करीत आहेत.