हिरापूर येथील 12 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

0

चाळीसगाव । तालुक्यातील हिरापूर येथील 12 वर्षीय मुलाचा येथील महावीर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान 30 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10.15 वाजता मृत्यू झाला असुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील हिरापूर येथील धनराज अशोक मोरे (वय 12) या मुलाच्या कमरेला सुज व जखम झाल्याने त्यास येथील दुध सागर मार्गावरील अमित जैन यांच्या महावीर हॉaस्पिटल मध्ये 29 जानेवारी रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचार सुरु असतांना आज 30 जानेवारी 2018 रोजी धनराज मोरे या मुलाचा सकाळी 10.15 वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी महावीर हॉस्पिटलचे डॉ.अमित जैन यांच्या खबरीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. असुन तपास साहाय्यक फौजदार हिरामण तायडे करीत आहेत. दरम्यान त्या मुलाचे शवविच्छेदन चाळीसगाव येथे न करता धुळे येथे शवविछेदन करण्यासाठी त्याचा मृतदेह नातेवाईकांनी धुळे येथे नेल्याचे समजते.