चाळीसगाव । शहरातील शिवाजी नगर परिसरातील रहिवाश्यांनी होत असलेल्या प्लॉट धारकांनी अतिक्रमण केले असून या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या दोन्ही चालणे देखी होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहे. याबाबत नगरपालिकेला वेळोवेळी तक्रार करूनही दखल आजवर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली नव्हती. त्यात बांधकाम विभागाचे अधिकारी अतिक्रमीत जागेचे मोजमाप करावयास आले असता पुर्ण मोजमाप न करता सारवासारव करुन निघून गेले होते. या बाबतीत आज नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होऊन नगरपरिषद कार्यालयावर धडक मोर्चा 21 जून रोजी नेण्यात आला व मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना देण्यात आले.
अतिक्रमण न काढल्यास ठोस पाऊल उचलण्याचा इशारा
शहरातील शिवाजी नगर परिसरातील सर्व्हे.क्र. 314 वरील 9 मीटर रस्त्यावर सुरुवातीलाच असलेल्या प्लॉट धारकांनी अतिक्रमण केलेले आहे. अतिक्रमणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला चालणे देखील अडचणीचे ठरत आहे. बाबतीत अनेकवेळा चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, प्रभागातील लोकप्रतिनिधींना वेळोवेळी पत्रव्यवहार देखील करण्यात आलेला होता. परंतु याची दखल आजवर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली नव्हती. त्यात बांधकाम विभागाचे अधिकारी अतिक्रमीत जागेचे मोजमाप करावयास आले असता पुर्ण मोजमाप न करता सारवासारव करुन निघून गेले होते.
आज नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होऊन नगरपरिषद कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. अतिक्रमण संदर्भात ठोस पाऊस न उचलले गेल्यास परिसरातील नागरिक नगरपरिषदेचा कुठलाही कर भरणार नाही असा धमकीवजा इशारा देखील संतप्त नागरिकांच्या वतीने देण्यात आला.
नागरीकांची होती उपस्थिती
यावेळी परिसरातील महिलांच्या वतीने देखील नगरपरिषद प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप करण्यात आला अतिक्रमण काढले न गेल्यास याहून तीव्र स्वरुपात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी नगरसेविका अलका गवळी, अनिल जाधव, सदाशिव गवळी, संजय पाटील, अविनाश वाबळे, वामनराव देशमुख, दुर्गेश जाधव, मधुकर पाटील, अशोक देशमुख, अविनाश साठे, दगा शिंदे, पंकज दाभाडे, चेतना शेलार, कमल जाधव, संजीवनी जाधव, रंजना पाटील, कुदाबाई जाधव, संजय पाटील, अरुण देशमुख, सचिन दाभाडे, बाळू कुमावत,राजेंद्र लगडे, शरद शेलार इत्यादी उपस्थित होते.