हिरालाल चौधरी पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध

नंदुरबार। शहरातील काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते हिरालाल चौधरी तर उपाध्यक्षपदी खंडू जयराम चौधरी यांची निवड केली आहे. तसेच उर्वरित सर्व संचालक मंडळाची निवड बिनविरोध केली आहे.

संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. यात सर्व संचालक मंडळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी हिरालाल मगनलाल चौधरी, उपाध्यक्ष खंडू जयराम चौधरी तर सदस्यांमध्ये रमेश शंभू चौधरी, दिलीप सखाराम चौधरी, डॉ. विशाल सुदाम चौधरी, रामेश्वर विष्णू दाणेज, अमृत शंकर चौधरी, पांडुरंग मदनलाल सराफ, शिरीष हिरालाल चौधरी, जितेंद्र रमेशगिरी गोसावी, रवींद्र हरी महिदे तसेच महिला प्रतिनिधी म्हणून अनिता शिरीष चौधरी, सुजाता नागेश भावसार यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगीता कोळी, सहाय्यक मोहन महादू चौधरी यांनी कामकाज पाहिले.