हिरा मारोती देवस्थान येथे संगीतमय रामायण कथा सप्ताहाचे आयोजन

0

भुसावळ। वरणगाव रोडवरील श्री हिरा मारोती देवस्थान येथे आदिशक्ती मुक्ताबाई प्राणप्रतिष्ठा व संगीतमय रामायण कथा सोहळ्याचे आयोजन 26 मे ते 2 जूनपर्यंत महंत पुजारी गोरखनाथ बाबा व हभप किशोर महाराज तळवेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यामध्ये 29 मे रोजी आदिशक्ती मुक्ताईच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा विधी करुन संत मुक्ताई वारकरी सत्संग मंडळास सहकार्य करणार्‍या भाविकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

दररोज सकाळी 6 ते 7 वाजता काकडा आरती, सकाळी 7 ते 8 वाजता हनुमान चालीसा पाठ, दुपारी 1 ते 6 पर्यंत रामायण कथा, संध्याकाळी 5 ते 6 संतभोजन, संध्याकाळी 6 ते 8 वाजता हरीपाठ, भजन असे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 2 जून रोजी सकाळी 8 ते 10 वाजता हभप किशोर महाराज तळवेलकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. कार्यक्रमाची सांगता नथ्थू राणे, तळवेल यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाने होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांना लाभ घ्यावा असे आवाहन संत मुक्ताई वारकरी सत्संग मंडळ, समस्त महिला व पुरुष भजनी मंडळ यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हभप नारायण बर्‍हाटे, देवराम इंगळे, पुरुषोत्तम वायकोळे, सुरेश झोपे, अनंत पाटील यांसह वारकरी मंडळ परिश्रम घेत आहे.