सूरत । आपल्या कर्मचार्यांना दिवाळीचा बोनस म्हणून कार आणि घर भेट देत सर्वांचे लक्ष आकर्षित करणार्या सूरतमधील व्यापारी सावजी ढोलकिया हे तुम्हाला माहिती असतीलच. ढोलकिया यांच्याच प्रमाणे सुरतमधील एका व्यापार्याने आपल्या कर्मचार्यांना वेतनवाढीसोबतच एक खास गिफ्टही दिले आहे.
सूरत येथील हिर्याचे व्यापारी लक्ष्मीदास वेकारिया यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. वेकारिया यांनी आपल्या 125 कर्मचार्यांना बोनस म्हणून स्कूटी भेट दिली आहे. 2010 मध्ये मालकाने हिर्यांचा व्यापार सुरू केला होता. तेव्हापासून कंपनीला जास्तीत जास्त नफा मिळावा यासाठी या कर्मचार्यांनी खूप मेहनत घेतली. याचीच परतफेड म्हणून मालकाने या कर्मचार्यांना स्कूटी गिफ्ट केली आहे. आपल्या कर्मचार्यांना अशा प्रकारची भेट देणारे लक्ष्मीदास वेकारिया हे एकमेव व्यापारी नाहीयेत. गुजरातमधील हिर्याचे व्यापारी सावजी ढोलकिया हेही आपल्या कामगारांना बोनस देतात. ढोलकिया यांनी गेल्या वर्षी हरे कृष्णा एक्स्पोर्ट्स या त्यांच्या कंपनीतील कामगारांना दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1260 कार भेट दिल्या होत्या. यावर कंपनीने 51 कोटी रुपये खर्च केले होते. तर, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अहमदनगरच्या झेन इलेक्ट्रिक कंपनीच्या संचालकांनी आपल्या 12 कर्मचार्यांना गुढीपाड्व्यानिमित्त कार भेट दिली होती.