मुंबई : बोरिवली येतील हिरे व्यापार्याकडील 24 लाख किंमती हिरे चोरल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यातील दोन जण मुंबई पोलीस कर्मचारी आहेत, चंद्रकांत गावरे आणि संतोष गवस अशी या दोन पोलीस कर्मचार्यांची नावे आहेत.
बोरिवली येथील हिरे व्यापार्याने गुजरातमधील हिरे व्यापार्याकडून हिरे आणले होते. या हिर्यांच्या विक्रीनंतर पोलीस कर्मचारी गावरे आणि गवत हे दोघेजण त्या हिरे व्यापार्याकडे आले आणि नुकत्याच झालेल्या हिर्यांचे विक्री व्यवहार तपासू लागले. त्यानंतर या पोलिसांनी त्यांच्याकडील 24 लाखा रुपयांचे हिरे ताब्यात घेतले. पोलिसांनी मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर या पोलिसांना दोन आरोपींसह अटक केली.