मुंबई । केवळ दोन महिने आणि तीन दिवसांच्या कालावधीत, मुख्य प्रशिक्षक अलेक्झांड्रा गिमारायस यांनी मुंबई सिटी एफसी संघाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. सातत्यपूर्ण चांगल्या खेळाचा अभाव आणि कमकुवत बचाव असणार्या हा संघ याआधी गुणपत्रिकेत तळाला असायचा. पण आता चित्र बदललेल आहे. कोस्टा रिकाच्या या प्रशिक्षकाने स्पर्धेच्या 60 दिवसांच्या कालखंडात अशीच कामगिरी केली तर मुंबई एफ सीचा संघ हिरो इंडियन सुपर लीगच्या यंदाच्या मोसमातील प्रभावशाली संघ असेल. संघाच्या कामगिरीबाबत गिमारायस म्हणाले की यंदाच्या हंगामात खेळाडूंची चांगली तयारी झाली आहे. खेळाच्या वैगवेगळ्या शैली आत्मसात करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळालेला आहे. ही लीग दीर्घ काळ चालणार आहे. त्यामुळे प्रत्येक मॅनेजरला आपल्या खेळाडूंच्या वैशिष्ट्यांची माहिती करुन घेण्यासाठी आणि रणनिती आखण्यासाठी संघासोबत आपल्या संघासोबत विचारविनिमय करण्यासाठी वेळ मिळणार आहे.
एफसी पुणे सिटीचे मुख्य प्रशिक्षक सर्बियाचे पोपोविच आहेत. पहिल्या संवादाच्यावेळी ते भारतीय पत्रकारांसह खेळीमेळीने बोलत होते. आपल्या संघाने सुद्धा तेवढ्याच प्रभावाने खेळ करावा असे त्यांना वाटत असावे. ते म्हणाले की, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी फुटबॉलचा खेळ खेळला जावा. हा खेळ आनंदाने खेळला जावा. हा खेळ आकर्षक असायला हवा. अर्थातच तुम्ही निकालाच्या मर्यादेत राहून धुर्तपणे खेळायला हवे. त्यामुळे माझा संघ प्रतिस्पर्ध्यांना कठोर पद्धतीने रोखण्यास सज्ज असेल. आम्ही परिस्थितीनुसार अखेरपर्यंत लढा देऊ, पण माझ्या संघाला एका पद्धतीने खेळायला सांगणे आणि त्यादृष्टिने प्रत्यक्ष मैदानावर अंमलबावणी करणे पूर्णपणे वेगळे असेल. आपण एका वेळी एका सामन्याचा विचार करूयात. पोपोविच यांच्या दृष्टिकोनाला गेल्या मोसमातील गोल्डन बूट विजेत्या मार्सेलिनो (मार्सेलो लैटे परेरा) याने पुष्टी दिली. गेल्या मोसमात दिल्ली डायनॅमोजकडून दहा गोल आणि पाच अॅसिस्ट (गोलांमध्ये साथ) अशी विलक्षण कामगिरी केल्यानंतर तो एफसी पुणे सिटीकडे दाखल झाला आहे. ब्राझीलचा हा फुटबॉलपटू म्हणाला की, फुटबॉल म्हणजे आनंद. आम्हाला भरपूर सकारात्मक पद्धतीने खेळायचे आहे.