हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट द्यावी

0

शहादा : हिवताप विभागातील सर्व कर्मचा – यांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सर्व प्रकारचे संरक्षक साहित्य ,औषधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत रक्त नमुणे संकलन करण्याचे काम सांगु नये अशी मागणी नंदुरबार जिल्हा राज्य आरोग्य कर्मचारी महासंघातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा हिवताप अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा देशात व राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून त्याच्यावर मात करण्यासाठी शासनाने ” लॉकडाऊन व सामाजिक अंतर ” हा एकमेव व प्रभावी मार्ग अवलंबला आहे . या अनुषंगाने जिल्हयात आरोग्य विभागाने वेगवेगळया माध्यमातुन लढा सुरु केलेला आहे . यात हिवताप विभागातील सर्व कर्मचारी सक्रीय झाले असुन हर त- हे चे काम करीत आहे . हे सर्व कामे करीत असतांना शासनाकडून व खात्याकडून तसेच आपणाकडून पीपीई किट , एन – ९५ मास्क , सॅनिटायझर व कर्मचा- यांनी स्वतःसाठी याअनुषंगाने घ्यावयाची औषधी व अन्य असे सर्व प्रकारचे सरंक्षक साहित्य यांचा कर्मचा – यांना पुरवठा करण्यात आलेला नाही . जिल्हयात सर्वत्र पुणे , मुंबई व परराज्यातुन तसेच परदेशातुन देखील मोठया प्रमाणात नागरिक आलेले आहेत व हे आलेले बहुतांश नागरिक जिल्हयात बाहेरुन प्रवास करुन आल्याची माहिती लपवितात . एकंदर अश्या सर्व परिस्थितींचा विचार करता हिवताप कर्मचा – यांजवळ कुठलेही स्व संरक्षणात्मक साहित्य ,औषधी , पीपीई किट उपलब्ध नसतांना व शासनाचे कोरोना विषाणू संबंधीच्या मार्गदर्शक सूचना पाहता दैनंदिन रक्त नमुने कसे घ्यावेत ? हा कर्मचा – यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे . गेल्या १० – १२ दिवसांपासुन जिल्हयातील सर्व हिवताप कर्मचारी स्थानिक अधिका – यांच्या मार्गदर्शनाखाली , त्यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणू विरुध्दच्या युध्दात हरत – हेचे काम करीत आहे . यापुढे देखील पुढील आदेश मिळेपर्यंत हिवताप कर्मचारी कोरोना विषाणू विरुध्दचा लढा सुरुच ठेवणार आहेत . एकंदर अश्या सर्व परिस्थितीचा विचार करता हिवताप कर्मचा – यांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणुन नालासोपारा , मुंबई येथे कर्तव्यावर असलेल्या आरोग्य कर्मचा – यास कोरोना विषाणू ची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले आहे . आपल्या आस्थापनेवरील काम करणा – या सर्व हिवताप कर्मचा – यांना पीपीई किट , एन – ९५ मास्क , सॅनिटायझर व अन्य सर्व प्रकारचे संरक्षक साहित्य , कर्मचा – यांसाठी अनुषंगीक त्यांनी घ्यावयाची औषधी यांचा पुरवठा संबंधीत कर्मचा – यांना जोपर्यंत होत नाही . तसेच सामाजिक अंतर वगैरे अनुषंगीक बाबींचा विचार करता दैनंदिन फिरस्तीमध्ये , दैनंदिन कामाचे रक्त नमुने संकलन करावे असे सांगु नये तसेच याकामी मार्गदर्शनपर आदेश व्हावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर जिल्हाध्यक्ष हर्षल मराठे,कार्याध्यक्ष प्रकाश चौधरी,सरचिटणीस राहुल माळकर यांच्या स्वाक्षरी आहेत.