हिवरखेडा येथून तरूण बेपत्ता

0

जामनेर। दालूक्यातील हिवरखेडे बुद्रूक येथील रहिवाशी वैभव युवराज महाजन वय 24 हा 18 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास जामनेरला काही कामधंदा पाहून येतो असे सांगून घरातून निघून गेलेला असून अद्यापपर्यत घरी परत आलेला नाही.

घरच्या नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला असता तो कोणाकडे ही आढळून आला नसल्यामूळे त्यांनी पोलीसात हरविल्याची तक्रार दिली आहे. युवराज ओंकार महाजन यांच्या खबरीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये रजिष्टर नंबर 44/17 प्रमाणे हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक विलास महाजन करीत आहे.