जामनेर। तालूक्यातील हिवरखेडे बुद्रूक येथे 12 रोजी रात्री अचानक आलेल्या वादळी वारा व पावसामुळे केळी बागांचे बाजार भावाप्रमाणे अंदाजे 1 कोटी रूपयांचे नुकसान झाले असून त्यांच्या पंचनाम्याचे काम काल दि.13 रोजी दुपारपर्यत सुरू होते. 12 रोजी रात्री अचानकपणे आलेल्या वादळी वारा व पावसामुळे येथील 46 शेतकर्यांचे 1 लाख 60 हजार केळी पिकांच्या लागवडी पैकी सुमारे 76 हजार केळीच्या खोडांचे नुकसान झाले.
नुकसानग्रस्त केळीचे पंचनामे सुरू आहे. 46 शेतकर्यांपैकी उषाबाई श्रीराम पाटील, मोहन प्रकाश महाजन, सचिन प्रकाश देशमुख, सागर अरूण महाजन, किरण भागवत महाजन या 5 शेतकर्यांचे 70 टक्के नुकसान झालेले आहे. पंचनामे करतांना पं.स.सदस्य अमर पाटील, उपसरपंच विक्रम महाजन, जितेंद्र पाटील, तलाठी पडागळे, कृषी सहा. के.के.शिवद आदी उपस्थित होते.