पाचोरा शहरात ४ घरांची पडझड; वेरुळी बुद्रुक येथे एका जनावराचा मृत्यू
नुकसानीचे पंचनामे करण्याची आजी-माजी आमदारांची मागणी
पाचोरा । पाचोरा तालुक्यात बुधवारी २० सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पाऊस, सुसाट्याचा वार्यामुळे पाचोरा-भडगांव तालुक्यात शेतकर्यांच्या कपाशी, मका, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. तर नगरदेवळा परिसरात केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानरग्रस्त शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी तहसिलदार बी.ए. कापसे, तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकुर, गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांंना आदेश दिले. यावेळी बाजार समिती सभापती उध्दव मराठे, पंढरीनाथ पाटील, अरुण पाटील, चंद्रकांत धनवडे उपस्थित होते. याच संदर्भात माजी आमदार दिलीप वाघ यांनी तहसिलदार यांना नुकसान भरपाई संदर्भात निवेदन दिले. नितीन तावडे, खलिल देशमुख, विकास पाटील सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पावसाची नोंद
तालुक्यातील वरखेडी – ९६ मि.मि., नांद्रा – ५५ , गाळण- ७०, नगरदेवळा – २३, पिंपळगांव – १२, कुर्हाड – ३६, पाचोरा शहर ९६ मी.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे तालुक्यातील बहुळा, हिवरा, उमरगे, अटलगव्हाण, सातगांव, पिंप्री, दिघी, गाळण या प्रकल्पांच्या जलसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली. जोरदार झालेल्या पावसामुळे पाचोरा शहरात चार घरांची पडझड होवुन वेरुळी बु येथील संजय पाटील या शेतकर्याच्या म्हशीचे पारडे दगावले. पाचोरा-भडगांव तालुक्यातील गुढे, वडजी, पिचर्डे, अंजनविहीरे, गाळण, तारखेडा येथे कापसाच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी आजी-माजी आमदारांनी केली. सामनेर परिसरात विस तारखेला झालेल्या जोरदार वादळ व पावसाने शेतातील ज्वारी, मका, कापुस ही पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे शेती साठी दमदार पावसाची गरज होती. परंतु वादळामुळे ज्वारी व मका व कापसाचे आतोनात नुकसान झाले आहे.